सलमान पुन्हा कायद्याच्या कचाट्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:59 IST
सलमान पुन्हा कायद्याच्या कचाट्यात?सलमान खानचा सुल्तान चित्रपट सध्या माहोल करतोय. अल्पावधीतच सुल्तानला मोठे यश मिळाल्याने सलमानसह या चित्रपटाची ...
सलमान पुन्हा कायद्याच्या कचाट्यात?
सलमान पुन्हा कायद्याच्या कचाट्यात?सलमान खानचा सुल्तान चित्रपट सध्या माहोल करतोय. अल्पावधीतच सुल्तानला मोठे यश मिळाल्याने सलमानसह या चित्रपटाची पूर्ण टीम जाम खूश आहे. परंतु एक व्यक्ती अशी आहे जी या चित्रपटामुळे जाम संतापली आहे आणि म्हणूनच त्या व्यक्तीने सलमान खानसह, अनुष्का शर्मा, चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास व यशराज फिल्मस्विरुद्ध थेट कोर्टात तक्रार दाखल केली आहे. शब्बीर अन्सारी असे या व्यक्तीचे नाव असून सुल्तान चित्रपटाची कथा त्याच्या जीवनाशी प्रेरीत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. शब्बीर अन्सारी हे बिहारचे राहणारे आहेत. सुल्तानची संपूर्ण कथा म्हणजे माझ्याच आयुष्याची गाथा आहे आणि ती माझ्या परवानगीशिवाय चित्रपटात वापरली गेली असा त्यांचा आरोप आहे. म्हणूनच त्यांनी या चित्रपटाचा नायक सलमान आणि टीमवर मुज्जफरपूरच्या कोर्टात दाद मागितली आहे. सलमान खानने मला या चित्रपटाच्या कथेसाठी २० कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते. परंतु त्याने त्याचे वचन पाळले नाही, असा आरोपही अन्सारी यांनी केला आहे. त्यांचा हा आरोप उद्या कोर्टात सिद्ध झाला तर सलमान पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो.