Join us
Daily Top 2Weekly Top 5

सल्लूमियाँ झाला चित्रकार; रेखाटले युलियाचे चित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 12:19 IST

 सलमान खान हा कलेचा खुप मोठा जाणकार आहे. त्याचे पॅशन जरी अभिनय असले तरीही त्याला दुसऱ्यांच्या  कला जाणून घ्यायला ...

 सलमान खान हा कलेचा खुप मोठा जाणकार आहे. त्याचे पॅशन जरी अभिनय असले तरीही त्याला दुसऱ्यांच्या  कला जाणून घ्यायला फार आवडते. पण, त्याच्यामध्ये आणखी दोन कला अशा आहेत ज्या अद्याप कुणाला माहिती नाहीयेत. त्या दोन कला म्हणजे पेंटिंग आणि स्केचिंग!त्याने नुकतेच त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतुर हिचे त्याने रेखाटलेले चित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. अनेकांना अगोदर फारच आश्चर्य वाटले की, खरंच हे चित्र सल्लूमियाँने रेखाटले आहे का? तर हो.या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘आॅर अ सेकंद ट्राय टू सी युअरसेल्फ थ्रू द आईज.’ वेल, सल्लूमियाँ तू हे तुझे पॅशन असेच कायम ठेव. युलियाची चित्रे रेखाटलीस तर ते अजूनच सुधारत जाईल नाही का?