सल्लूमियाँ-कॅटरिना अॅड फिल्मसाठी एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 11:30 IST
ते दोघे पुन्हा एकत्र आले! सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा ब्रेक अप झाल्याने त्या दोघांनी एकही चित्रपट किंवा ...
सल्लूमियाँ-कॅटरिना अॅड फिल्मसाठी एकत्र!
ते दोघे पुन्हा एकत्र आले! सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा ब्रेक अप झाल्याने त्या दोघांनी एकही चित्रपट किंवा अॅड शूट, पार्टी कुठेही ते दोघे एकत्र दिसले नाहीत. सलमानपासून दुरावल्यानंतर कॅटला मिळणाºया चित्रपटांची संख्याही कमी होत गेली. मात्र, तरीही तिला ‘फितूर’, ‘बार बार देखो’ हे दोन चित्रपट मिळाले.पण, आता असे वाटतेय की, त्यांच्यातील समज-गैरसमज दूर झाले आहेत. त्यामुळे ते ‘हाय एंड फॅशन ब्रँड’ साठी पुन्हा आता एकत्र आले आहेत. याअगोदर ते दोघे कबीर खान यांच्या ‘एक था टायगर’ मध्ये एकत्र दिसले होते.सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर कॅट रणबीरसोबत अनेकदा पार्टींमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये दिसत होती. वेल, आता अॅड फिल्म मिळालीय ना ? मग आता त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम अवश्य परत येईल यात काही शंकाच नाही. संभालके युलिया...!