कुस्तीला जाण्यापूर्वी चक्क सलमानची पूजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 11:10 IST
सलमानने 'सुल्तान' चित्रपटात पैलवानाची भूमिका केली होती. सलमानच्या सुल्तानने बॉक्स आॅफिसवर भरपूर कमाई केली होती. पैलवानाची भूमिका केलेला सलमान ...
कुस्तीला जाण्यापूर्वी चक्क सलमानची पूजा!
सलमानने 'सुल्तान' चित्रपटात पैलवानाची भूमिका केली होती. सलमानच्या सुल्तानने बॉक्स आॅफिसवर भरपूर कमाई केली होती. पैलवानाची भूमिका केलेला सलमान आता पैलवानांचा देव बनला आहे. ‘सुलतान’ चित्रपटाचे फिव्हर एवढे वाढले असून सलमानला यामुळे देवत्व प्राप्त झाले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये चंदू आखाडा नावाची तालिम आहे. यातील पैलवान कुस्तीला सुरुवात करण्यापूर्वी सलमानची पूजा अर्चा करतात.कुस्तीला आरंभ करण्यापूर्वी पैलवान सलमानच्या फोटोची फूल वाहून पूजा करतात आणि आरतीही म्हणतात. सलमानच्या फोटोला नमस्कार केल्यानंतरच ते आपल्या कुस्तीला सुरुवात करतात.