Join us

सैफ आम्हाला म्हणतो,‘ क्रेझी ईटालियन माफिया फॅमिली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 23:25 IST

वांद्रे येथील तिच्या घरात एका रॉयल लूक मध्ये बेगम करिना कपूर खान बसलेली आहे. तिच्या अवतीभोवती लग्नाचे रॉयल फोटोज ...

वांद्रे येथील तिच्या घरात एका रॉयल लूक मध्ये बेगम करिना कपूर खान बसलेली आहे. तिच्या अवतीभोवती लग्नाचे रॉयल फोटोज आहेत. तिला तिच्या रॉयल आयुष्याविषयी विचारले असता ती म्हणते,‘ उफ, मी बेगम नाही. माझी मदर इन लॉ (शर्मिला टागोर) खरी बेगम आॅफ पतौडी आहेत. ती खरंच खुप चांगली आई, पत्नी आणि अभिनेत्री आहे. आम्ही फार क्लोज आहोत. मला पतौडी पॅलेसला जाणे बेहद आवडते. आता तेच माझ्यासाठी घर आहे. ’कपूर खानदानविषयी बोलताना सैफ म्हणतो,‘ हे एक क्रेझी, भारतीय माफिया कुटंूब आहे. तेथील घरात नेहमी ३० डिशेस टेबलवर असतात. सर्वांचे लक्ष जेवण आणि ड्रिंक्स यांवरच असते. माझे कुटुंबीय माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे आहेत. मी कु ठल्या जगात आहे हे महत्त्वाचे नाही. माझी आजी (कृ ष्णा राज कपूर) आमच्यासोबत असेल तर मग काय आनंदच आनंद आहे..’