Join us

सैफ प्रोफेशनल - शाहीद कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:31 IST

शाहीद कपूर, सैफ अली खान आणि कंगणा राणावत ही टीम सध्या 'रंगून' या आगामी रोमँटिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...

शाहीद कपूर, सैफ अली खान आणि कंगणा राणावत ही टीम सध्या 'रंगून' या आगामी रोमँटिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्या तिघांमध्ये चित्रपटाच्या सेटवर एक चांगली बाँडिंग तयार झाली आहे.दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या तिन्ही उत्तम कलाकारांना एकत्र आणले आहे. जेव्हापासून या चित्रपटाच्या शूटिंगचे काम हाती घेण्यात आले आहे तेव्हापासून चित्रपटाविषयी अनेक बातम्या बाहेर पडत आहेत.सैफविषयी बोलताना शाहीद म्हणतो की,' मी सैफसोबत दोन दिवस काम केले. तो खुपच प्रोफेशनल आहे. कुणीही त्याच्याप्रमाणे भूमिका करू शकत नाही. चित्रपटात तो म्हणजे एक खरंच चांगला कलाकार आहे. तसेच कंगणासाठीही मी म्हणू इच्छितो. मी वाट पाहतोय की, आम्ही तिन्ही क लाकारांना चाहते कशाप्रकारे रिअँक्ट करतील हे मला पहायचे आहे.