Join us

सैफ अली खानच्या या गोष्टीमुळे करिना कपूरला येते रडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 12:54 IST

सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर यांच्या मधले प्रेम सगळ्यांच माहिती आहे. एक मुलाची आई असलेली करिना ...

सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर यांच्या मधले प्रेम सगळ्यांच माहिती आहे. एक मुलाची आई असलेली करिना सैफ जेव्हा आजही घराबाहेर पडतो तेव्हा करिनाला रडू कोसळत कारण ती सैफला खूप मिस करते हा खुलासा खुद्द करिनाने एक इंटरव्ह्रु दरम्यान केला आहे. करीनाने मुलाखतीत सांगितले की, सैफ घरी राहतो, तेव्हा मी खुप खुश असते. परंतू तो बाहेर गेला की, मला खुप वाईट वाटते. मी त्याला मिस करुन रडते.या इव्हेंटमध्ये करिनाला तुला सगळ्यात स्टायलिश कोण वाटते असे विचारण्यात आले त्यावर ती म्हणाली तैमूर अली खान. तैमूरची स्टाईल तिला सगळ्यात जास्त आवडते. 2016मध्ये करिनाने तैमूरला जन्म दिला आहे. तैमूर आज सगळ्यात पॉप्युलर स्टार किड्सपैकी आहे. 2007 मध्ये करिनाचे शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफ अली खानसोबत तिची जवळीक वाढली होती. 'ओमकारा' या चित्रपटासाठी सैफ आणि करीनाचे एकत्र सीन खुप कमी होते. तरीही हे दोघे एकत्र दिसत होते. यानंतर यशराज बॅनरच्या 'टशन' च्या शूटिंगच्या वेळी या दोघांची जवळीक दिसली आणि त्यानंतर ते लग्नाच्या बेडीत अडकले. करिना सध्या तिच्या वीरे दी वेडिंग चित्रपटात बिझी आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात सोनम कपूरसह करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे.करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. या चित्रपटातून रिया ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे. ALSO READ :  ​सैफशी लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने ठेवली होती ही अट?