सैफ अली खानसोबत टीव्हीवर दिसणार तैमूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 20:11 IST
बॉलिवूड स्टार करिना कपूर व सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर जन्मापासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याबाबत वेगवेगळ्या ...
सैफ अली खानसोबत टीव्हीवर दिसणार तैमूर!
बॉलिवूड स्टार करिना कपूर व सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर जन्मापासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. एका नव्या बातमीनुसार तैमूर लवकर वडील सैफ अली खानसोबत टीव्ही डेब्यू करेल अशी चर्चा सुरू झाली आहे. टीएलसी वाहिनीवर लवकरच ‘लिव्हिंग विद अ सुपरस्टार’ हा कार्यक्रमाचा दुसरा सिजन सुरू होणार असून या शोमध्ये सैफची ‘डेली लाईफस्टाल’ दाखविली जाणार आहे. यामुळे तैमूर अली खान यात दिसेल असे सांगण्यात येत आहे. तैमूरच्या चाहत्यांसाठी व त्याला पाहण्याची उत्सुकता असणाºयांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. टीएलसीच्या या शोमध्ये सैफच्या दिवसभरातील सर्व घडामोडी शूट केल्या जाणार आहेत. यामुळे तो आपल्या मुलासोबत कसा वेळ घालवितो याचा देखील यात समावेश असेल. यामुळे तैमूरला टीव्हीवर आपल्या आई-वडिलांशी खेळताना पाहता येणार आहे. मागील काही दिवसांत तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. करिनाने आपल्या पहिल्या बाळाला १९ तारखेला जन्म दिला. याच दिवशी याचे नामकरण तैमूर असे करण्यात आले. प्रेगनेन्सीदरम्यान करिनाने आपल्या बाळाचे नाव सैफिना असेल किंवा त्याचे नाव एतिहासिक व्यक्तीशी संबधित असेल असे सांगितले होते. काहींच्या मते मुलगी झाली तर तिचे नाव सैफिना असे ठेवण्यात आले असते. मात्र मुलगा झाला व त्याचे नाव तैमूर ठेवल्यावर सोशल मीडियावर त्याच्या नावावर चांगलेच वादळ उठले. ऋषि कपूर यांनी आपल्या नातवाच्या नावाचा बचाव करताना सोशल मीडियावर तैमूरच्या नावावर चर्चा करणाºयांना ट्विट करून चांगलीच चरपाक लगावली होती. यानंतर करण जोहर याने तैमूरच्या नावावर ट्रोल करणाºयांना कुणालाही नावावरून गंमत करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आहे.