Join us

काय सांगता? ‘या’ अभिनेत्रीमुळे सैफ अली खानने करिना कपूरला केले होते डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 08:00 IST

सैफ अली खान व करिना कपूरची लव्हस्टोरी सगळ्यांना ठाऊक आहे. पण सैफिनाला एकमेकांच्या जवळ आणणारी व्यक्ती कोण, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व करिना कपूरची लव्हस्टोरी सगळ्यांना ठाऊक आहे. पण सैफिनाला एकमेकांच्या जवळ आणणारी व्यक्ती कोण, हे तुम्हाला ठाऊक आहे का? आता खुद्द सैफनेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.  सैफ व करिनाची नजरानजर झाली होती. दोघांच्याही मनात प्रेमाची पालवी फुटली होती. पण खरे सांगायचे तर सैफ मनातून घाबरला होता. करिना कशी रिअ‍ॅक्ट करेल, आपल्याला कशी ट्रिट करेल, या प्रश्नांनी त्याला अस्वस्थ केले होते. अशात सैफच्या एका मैत्रिणीने त्याची मदत केली होती. सैफची ही मैत्रिण दुसरी तिसरी कुणी नसून राणी मुखर्जी होती.

होय, राणीने  सैफच्या मनातील भीती नेमकी ओळखली होती. तिच्याच सल्ल्याने सैफने करिनाला डेट करत तिच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला होता.

होय, करिना कपूरच्याच ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या रेडिओ टॉक शोमध्ये सैफने हा खुलासा केला. करिनाच्या प्रश्नांना उत्तरे देताना सैफने सांगितले की, ‘मला आठवते, आपण दोघे डेट करत होतो तेव्हा राणीने मला एक सल्ला दिला होता.  करिनाला डेट करताना व पुढे जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, तू एका हिरोईनला नाही तर ‘हिरो’ला डेट करत आहेस, असे राणी मला म्हणाली होती.

स्त्री-पुरूष हा भेद करू नकोस, असा तिच्या म्हणण्याचा अर्थ होता. तुझ्या घरात दोन सुपरहिरो असतील. तू एका महिलेसोबत आयुष्य घालवणार आहेस, हे डोक्यातून काढून टाक. तुझ्याइतकीच मेहनत करणाºया एका व्यक्तीसोबत तू आयुष्य घालवणार आहेस,असे समजून पुढे गेलास तर घरात कुठलीही समस्या निर्माण होणार नाही, हे तिने मला समजावले होते. माझ्या मते, राणी एकदम योग्य बोलली होती.’

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरराणी मुखर्जी