Join us  

"आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, त्यांना 'स्टारकिड' बनवणारे तुम्हीच" सैफ अली खानचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 5:23 PM

नेपोटिझम आणि तैमूरच्या लोकप्रियतेवरुन सैफ अली खानने दिली प्रतिक्रिया

मनोरंजनसृष्टीत घराणेशाहीवरुन सतत वाद विवाद होत असतात. 'नेपोटिझम' (Nepotism) नावाने फिल्म इंडस्ट्रीत हा वाद वाढतच गेला. निर्माता करण जोहरला नेपोटिझमवरुन बरंच ट्रोल केलं गेलं. करण केवळ स्टारकिड्सलाच त्याच्या सिनेमांमध्ये लाँच करतो अशी टीका झाली. सैफ अली खानने (Saif Ali Khan) नुकतंच एका मुलाखतीत स्टारकिडवरुन मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन आता सैफ अली खान ट्रोल होण्याचीही शक्यता आहे. 

बॉलिवूडमध्ये सध्या कलाकारांपेक्षा जास्त स्टारकिड्सचीच चर्चा आहे.सैफ अली खान आणि करीना कपूर दोघांनी नुकतंच यावर आपली प्रतिक्रिया दिली. सैफ आणि करीनाला तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर सैफला पहिल्या पत्नीपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. सारा सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे तर इब्राहिमही पदार्पण करण्याच्या तयारित आहे. इंडस्ट्रीत अनेक टॅलेंटेड कलाकारांना पटकन संधी मिळत नाहीत जितक्या लवकर या स्टारकिड्सना मिळतात. यावर सैफ-करीनाने फिल्मकंपॅनियनशी दिलखुलास बातचीत केली. 

करीना म्हणाली, "आडनावाचा फायदा तुम्हाला मिळत नाही जोवर तुम्ही टॅलेंट सिद्ध करत नाही. तुमचं अमुक एक आडनाव आहे याचा अर्थ हा नाही की तुमच्यात टॅलेंट आहे आणि तुम्हाला यशही मिळेल. याचा निर्णय तर प्रेक्षकच देणार आहेत. सध्याच्या सोशल मीडिया युगात स्टार असणं काही फार मोठं नाही. लोक फोटो बघतात, ४० मिलियन फॉलोअर्स पाहतात, तुम्हाला 30 हजार लाईक्स मिळतात म्हणजे तुम्ही स्टार झाले असं नाही. तुम्हाला तुमच्या कामातून ते सिद्ध करावं लागतं."

सैफ अली खान या चर्चांवर म्हणाला, "प्रेक्षकांनाच फार इंटरेस्ट असतो. आर्चीजचंच उदाहरण घ्या. या सिनेमाची किती चर्चा झाली. यातील स्टारकिड्सचे फोटो काढले, त्यांना फॉलो केलं गेलं. आता कोणाला किती मोठं करायचं हे प्रेक्षकच ठरवतात."

तो पुढे म्हणाला, "तैमुर तायक्वान्दो करत होता, लोक त्याचे फोटो काढत होते. सोशल मीडियावर त्याचे रील्स बनतात. आम्हालाही हे नकोच आहे. आम्ही मुलं जन्माला नक्कीच घालतो पण आम्ही त्यांना स्टारकिड बनवत नाही. माध्यम,फोटोग्राफर्स आणि प्रेक्षकच त्यांना स्टारकिड बनवतात."

या मुलाखतीत करिना आणि सैफने तैमुरच्या भविष्यातील डेब्युवरही प्रतिक्रिया दिली. तैमुरला सध्या अभिनयात यायचं नसून तो लीड गिटारिस्ट आणि फुटबॉलर आहे. त्याला अर्जेंटिनामध्ये जायचं आहे. फुटबॉल खेळाडूस बनायचं आहे असं दोघं यावेळी म्हणाले.

टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडसोशल मीडियाट्रोलतैमुर