Join us
Daily Top 2Weekly Top 5

खेळणी बनवणा-या कंपन्यांनाही तैमुरची भुरळ, बाजारात आला ‘तैमुर बाहुला’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:17 IST

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देहोय, आता खेळणी बनवणा-या कंपन्याही तैमुरची ही लोकप्रीयता कॅश करू पाहत आहेत.

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता तर खेळणी बनवणा-या कंपन्याही तैमुरची ही लोकप्रीयता कॅश करू पाहत आहेत. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. खेळणी बनवणा-या कंपन्यांनी तैमुर  बाहुला बाजारात आणला आहे. एका चॅनलशी संबंधित अश्विनी यारदी यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या तैमुर  बाहुल्याचे फोटो शेअर केले आहे. हा बाहुला केरळच्या एका स्टोर्समध्ये विकल्या जात आहे, असे अश्विनीने आपल्या या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. फोटोतील हा बाहुला हुबेबहुब तैमुरसारखा दिसतोय. या बाहुल्यावर तैमुर किती लोकप्रीय आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही.

तैमुर अली खानचे फोटो बॉलिवूड स्टार्सपेक्षाही महाग विकल्या जातात. काही दिवसांपूर्वी कॉफी विद करणच्या नव्या एपिसोडमध्ये खुद्द करण जोहरने याचा खुलासा केला होता.

तैमुर  बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही लोकप्रीय आहे. त्याचे फोटो सर्वाधिक किमतीत विकले जातात. तैमुरच्या एका फोटोची किंमत १५०० रूपये आहे, असे मला कळले आहे, असे करण जोहरने सांगितले होते.

तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीला त्याचे हेच नाव वादाचा विषय बनले होते. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडी त्याचे नाव आहे.

करीना आणि सैफ यांचा मुलगा तैमूर खूप लहान असला तरी खूप लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. तसेच तैमूरदेखील कॅमेऱ्यासमोर अजिबात घाबरत नाही. उलट तो स्माइल देतो. सैफ करीना तैमूरला जास्त अटेंशन मिळत असल्यामुळे थोडे त्रस्त आहेत.

तैमूरसाठी करीना कपूर दोन वर्षे बॉलिवूडपासून दूर होती. दोन वर्षानंतर करीनाने वीरे दी वेडिंगमधून पुनरागमन केले. यातील तिने साकारलेली वीरेची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. आता ती करण जोहरच्या तख्त चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :तैमुरसैफ अली खान करिना कपूर