Join us

"तो सेटवर उशीरा यायचा त्यामुळे आम्हाला त्रास व्हायचा"; प्रसिद्ध अभिनेत्याने केली सैफ अली खानची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:38 IST

सैफ अली खान उशीरा सेटवर यायचा त्यामुळे सर्वजण त्याची वाट बघत बसायचे, असा खुलासा कुणाल कपूरने केलाय (saif ali khan)

सगळ्यांना सैफ अली खानच्या (saif ali khan) आगामी 'ज्वेल थीफ' सिनेमाची (jewel thief movie) सर्वांना उत्सुकता आहे. सैफ अली खानवर जो चाकू हल्ला झाला त्यानंतर अभिनेत्याचा हा पहिलाच सिनेमा रिलीज होणार आहे. ओटीटीवर हा सिनेमा सर्वांना काहीच दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. अशातच 'ज्वेल थीफ' सिनेमातील सैफ अली खानचा सहकलाकार कुणाल कपूरने (kunal kapoor) सैफच्या वागण्याविषयी चांगलीच पोलखोल केलीय. सैफसोबत काम करणं किती अवघड होतं, याविषयी कुणालने सांगितलंय.

'ज्वेल थीफ'च्या शूटिंगदरम्यान सैफ उशीरा यायचा

अभिनेता कुणाल कपूरने आगामी चित्रपट ‘ज्वेल थीफ’ च्या शूटिंग दरम्यानचा एक खास अनुभव शेअर केला. त्यावेळी कुणालने सैफ अली खानबाबत एक खास वक्तव्य केलं आहे. त्याने सांगितलं की, "सैफ अली खान नेहमी उशिरा शूटिंग सेटवर पोहोचायचा आणि त्यामुळे अनेक वेळा काम करणं अवघड होऊन जायचं. सैफ खूपच कूल आणि टॅलेंटेड आहे, पण तो वेळेवर सेटवर पोहोचत नाही, ही एक गोष्ट खूप त्रासदायक होती. आम्ही वेळेवर तयार असायचो, पण त्याची वाट बघावी लागायची.”

कुणाल पुढे म्हणाला की, “सैफ सेटवर यायचा मात्र त्याला संवाद पाठ नसायचे. त्यामुळे त्याचे संवाद नीट होईपर्यंत एकामागून एक टेक होत राहायचे. पण सैफ सेटवर आला की, वातावरण हलकंफुलकं होई. तो खूप विनोदी आहे आणि त्याच्याशी गप्पा मारणं मजेशीर असतं." 'ज्वेल थीफ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २५ एप्रिलला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात सैफसोबत जयदीप अहलावत, कुणाल कपूर, निकिता दत्ता हे कलाकारही दिसणार आहेत.

टॅग्स :सैफ अली खान नेटफ्लिक्सकुणाल कपूरबॉलिवूड