Join us

Memes : करिनाने धाकट्या लेकाचं नाव ठेवलं ‘जहांगीर’, सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 15:11 IST

Viral Memes : करिनाच्या धाकट्या लेकाच्या नावावरूनही ट्विटरवर उठले ‘वादंग’, सैफिना झाले ट्रोल

ठळक मुद्दे2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते.

करिना कपूरच्या (Kareena Kapoor Khan) दुसऱ्या लेकाचं नाव ‘जेह’ नाही तर ‘जहांगीर’ ( Jehangir Ali Khan) आहे. करिनाने दुसऱ्याबाळाला मुलाला दिला अगदी तेव्हापासून त्याचं नाव काय असणार? याची चर्चा सुरू झाली होती. सैफिनाने दुसऱ्या बाळाचं नाव काय ठेवलं, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. काही दिवसांपूर्वीच बेबोच्या दुसऱ्या बाळाचं नाव ‘जेह’ असं ठेवण्यात आल्याच्या चर्चा होत्या. पण आता त्याच्या खऱ्या नावाचा खुलासा झाला आहे. होय,  ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकात करिनाने तिच्या धाकट्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ ठेवल्याचा खुलासा केला आहे.

करीना कपूरने लिहिलेल्या ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकाच्या शेवटच्या पानांवर तिच्या गरोदरपणातील तसचं त्यानंतरचे काही फोटो आहेत. या फोटोंमध्ये करीनाने दुसऱ्या बाळाचा फोटोदेखील दिला असून या फोटोला तिने ‘जहांगीर’ असं नाव दिलं आहे. तूर्तास करिनाच्या या बाळाच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यावरचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. करिना व सैफनं पहिल्या मुलाचं नाव तैमूर ( taimur) ठेवलं, तेव्हा लोक संतापले होते. यावरून सैफिना जबरदस्त ट्रोल झाले होते. आता दुसऱ्या मुलाच्या नावावरूनही सैफिनाला ट्रोल केलं जातंय.

सैफिनाला मुगलांची टीम बनावयची आहे, असं एका ट्रोलरनं सैफिनाला ट्रोल करताना लिहिलं आहे. पहिला तैमूर, दुसरा जहांगीर आता तिसऱ्याचं नाव काय असणार? असे डिवचणारे प्रश्न अनेक युजर्सनी केले आहेत.

2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते.

तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्यानं तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटलं जातं. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचं नाव ठेवावं, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अधिकृतपणे जाहिर केलेले नाही. शिवाय अद्याप त्याचा चेहराही जगाला दाखवलेला नाही.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान