Join us

सचिन तेंडुलकरचा 'नाटू नाटू'वर डान्स; अक्षय कुमार, राम चरणबरोबर थिरकला मास्टर ब्लास्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 18:02 IST

Video : नाटू नाटू...; क्रिकेटच्या मैदानावर अक्षय कुमार आणि राम चरणबरोबर थिरकला मास्टर ब्लास्टर

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या RRR सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. २०२२ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमानेच नाही तर त्यातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. RRR मधील 'नाटू नाटू' गाण्यावर अनेक रील्सही व्हायरल झाले होते. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरता आला नव्हता. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला नाटू नाटूची भुरळ पडली आहे. 

सध्या ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रिमियर लीग सुरू आहे. ISPLला आजपासून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथून सुरुवात होणार आहे. या लीगच्या ओपनिंग सेरेमनी दरम्यान क्रिकेटचा देव मैदानावर थिरकताना दिसला. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सचिन तेंडुलकरसह राम चरण, अक्षय कुमार आणि रवी शास्त्रीही 'नाटू नाटू' गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानावरील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करमध्येही पुरस्कार मिळाला होता. बेस्ट ओरिजनल साँग या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला होता. ऑस्करमध्येही या गाण्यावर परफॉर्म करण्यात आलं होतं. अजूनही या गाण्याची क्रेझ कमी झाल्याचं दिसत नाही. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरऑफ द फिल्डअक्षय कुमारराम चरण तेजा