Join us  

दीपिकाने लग्नात नेसलेली कांजीवरम साडी होती खास...! सब्यसाची यांनी केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 1:10 PM

दीपिकाने कोंकणी लग्नात घातलेली कांजीवरमची सिल्क साडी डिझाईनर सब्यसाची यांनी डिझाईन केली नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकोंकणी परंपरेनुसार, वधूची आई आपल्या मुलीला लग्नाची साडी भेट देते. त्यानुसार उज्ज्वला यांनी दीपिकाला ही साडी गिफ्ट केली होती.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न यंदाचे सर्वात मोठे लग्न आहे. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपवीरने सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. इटलीच्या लेक कोमो येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे अनेक फोटो दीपवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोतील दोघांची केमिस्ट्री दृष्ट लागावी, अशी आहे. तूर्तास तरी दीपवीरच्या लग्नाबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सूक आहेत. अशीच गोष्ट म्हणजे, दीपिकाने कोंकणी लग्नात घातलेली कांजीवरमची सिल्क साडी डिझाईनर सब्यसाची यांनी डिझाईन केली नसल्याचे समोर आले आहे.

खुद्द सब्यसाची यांनी हा खुलासा केला आहे. होय, दीपिकाची लग्नातील गोल्डन साडी तिच्या आईने म्हणजे उज्ज्वला पादुकोण यांनी गिफ्ट केलेली होती. या साडीवर काही कारीगरी करण्यासाठी ती सब्यसाची यांना देण्यात आली होती. बेंगळुरूच्या अंगाडी गॅलरीतून ही साडी खरेदी करण्यात आली होती.

कोंकणी परंपरेनुसार, वधूची आई आपल्या मुलीला लग्नाची साडी भेट देते. त्यानुसार उज्ज्वला यांनी दीपिकाला ही साडी गिफ्ट केली होती. याच साडीवर दीपिकाचे लग्न लागले.आज बेंगळुरु येथे दीपिका व रणवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बेंगळुरुच्या लीला पॅलेस येथे हे रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये दीपिका व रणवीर दोघेही सब्यसाची यांनी डिझाईन केलेल्या पोशाखात दिसतील. तूर्तास चाहते, दीपवीरचे रिसेप्शनचे फोटो पाहण्यास उत्सूक आहेत. आज २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग