यात ती वरुण धवनच्या अपोझिट दिसणार आहे. अनुष्का सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरच्या फोटोंमध्ये अनुष्का साडीमध्ये मध्ये दिसते आहे.
सोमवारी अनुष्काने स्वत: ट्वीटर अकाऊंटवर या चित्रपटाशी संबंधीत फोटो पोस्ट केला होता. त्यातही ती शिवण काम करताना दिसत होती. यात ती एका स्ववलंबी लेडीज टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर वरुण धवनही टेलरची भूमिका साकारणार आहे. पहिल्यांदा अनुष्का आणि वरुण एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहे. तर मनीष शर्मा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. यापूर्वी ‘दम लगाके हईशा’मध्ये मनीष व शरत यांच्या टीमने एकत्र काम केले होते. यश राज बॅनरखाली तयार होणार हा चित्रपट गांधी जयंतीच्या आधी चित्रपटातगृहात प्रदर्शित होणार आहे म्हणजेच 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेड इन इंडिया’च्या आयडॉलॉजीवर आधारित या चित्रपटात एक नवी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
ALSO READ : अनुष्का शर्माचे ‘हे’ रूप पाहून अंगावर येतील शहारे! पाहा, ‘परी’चा घाबरवणारा टीजर!!
या चित्रपटाचा दिग्दर्शक मनिष शर्मा म्हणाला, आम्हाला या चित्रपटासाठी एक अशी अभिनेत्री हवी होती जी या भूमिकेत सहजपणे उतरले. जी बुद्धिमानपणे आणि शांतते आपले म्हणणे सांगू शकते.
या चित्रपटासह अनुष्काच्या खात्यात अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या परी चित्रपटात ती दिसणार आहे. हा एक सुपरनॅचुरल थ्रिलर असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आनंद एल रॉय यांच्या आगामी चित्रपट हिरोमध्ये ही ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे.