सलमान खानची खिल्ली उडविणाऱ्या पाकी अभिनेत्री सबा कमरला झाली उपरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 15:37 IST
‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ ही म्हण पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिला तंतोतंत लागू होते. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडच्या अनेक अॅक्टर्सची खिल्ली उडविणारी व सुपरस्टार सलमान खानला ‘छिछोरा’ म्हणणाºया सबा कमरला आता तिने केलेल्या टीकेची उपरती झाली आहे.
सलमान खानची खिल्ली उडविणाऱ्या पाकी अभिनेत्री सबा कमरला झाली उपरती
‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ ही म्हण पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिला तंतोतंत लागू होते. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडच्या अनेक अॅक्टर्सची खिल्ली उडविणारी व सुपरस्टार सलमान खानला ‘छिछोरा’ म्हणणाºया सबा कमरला आता तिने केलेल्या टीकेची उपरती झाली आहे. आता म्हणे, मी बॉलिवूडच्या सुलतानचा (सलमान खान) खूप आदर करते. मी जे काही बोलले ते चेष्टा मस्करीत बोलले, मुळात तो शो कॉमेडीवर आधारित असल्याचे तिने म्हटले आहे. सबाला सुचलेल्या या शहाणपणामागे भाईजानची बॉलिवूडबरोबरच पाकी कलाकारांमध्येही काय दहशत आहे, हेच यानिमित्त अधोरेखित होते. एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी सबाने केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण दिले. यावेळी सबाने सांगितले की, तिच्या हृदयात भारतीय फिल्म इंडस्ट्री आणि सलमान खान यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. परंतु सबाचा हा एकप्रकारचा माफिनामा भाईजानच्या पचनी पडेल का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच. कारण फवाद खान, माहिरा खान यांच्या पाठोपाठ सबाही बॉलिवूडच्या वाटेवर आहे. परंतु तिने सुरुवातीला इंडस्ट्रीतील कलाकारांना त्यातही सुपरस्टार सलमान खानला डिवचल्याने तिची बॉलिवूड वाट बिकट असेल यात तिळमात्रही शंका नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी सबाने एका पाकिस्तानी टॉक शोमध्ये सलमान खानसह, हृतिक रोशन, रितेश देशमुख, इमरान हाशमी यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला हाता, तेव्हा भारतीय नेटिझन्स व इंडस्ट्रीमधून तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. Also Read : पाकी अभिनेत्री सबा कमर बरळली, ‘दबंग खान’ सलमानची उडवली टर!‘गुड मॉर्निंग जिंदगी के’ या पाकिस्तानी टॉक शोमधील या व्हिडीओमध्ये सबाला बॉलिवूडच्या काही स्टार्सचे फोटो दाखवून त्यांच्याबरोबर काम करण्याची आॅफर नाकारणे व त्यामागचे कारण विचारले होते. यावेळी सबाला हृतिकचा फोटो दाखविण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली की, हृतिक रोशनसोबत मी काम करणार नाही, कारण तो माझ्या टाईपचा नाही. तो दोन मुलांचा बाप आहे. इमरान हाश्मीचा जेव्हा फोटो दाखविण्यात आला, तेव्हा मला तोंडाच्या कर्करोगाला निमंत्रण द्यायचे नाही, असे म्हटले. रितेश देशमुखला तर ब्री-ग्रेट हीरोच्या रांगेत तिने बसविले होते. मात्र जेव्हा शोच्या होस्टने सलमान खानचा फोटो दाखवला, तेव्हा सबाने अतिरेकच केला होता. सल्लू भाईची मला फार भीती वाटते. नाही बाबा, तो भलताच ‘छिछोरा’ आहे. ना त्याची कुठलीही स्टाईल आहे, ना त्याला नाचता येत, असे तिने म्हटले होते. सध्या पाकी कलाकारांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशात सबाचा हा व्हिडीओ आगीत तेल ओतणारा ठरत आहे. खरं तर सबा करम हे पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये फारसे मोठे नाव नाही. २००४ मध्ये अभिनयास सुरुवात करणाºया सबाला आता बॉलिवूडचे वेध लागले आहेत. मात्र तिच्या या टीकेमुळे तिला बॉलिवूडमध्ये कायमची ‘नो एंट्री’ केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.