Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘रुस्तम’ने गाठला १०० कोटी क्लबचा टप्पा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 17:56 IST

अक्षय कुमार स्टारर ‘रुस्तम’ चित्रपटाने एकाच आठवड्यात १०० कोटी क्लबचा टप्पा गाठत २०१६ मधील व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर चित्रपट ...

अक्षय कुमार स्टारर ‘रुस्तम’ चित्रपटाने एकाच आठवड्यात १०० कोटी क्लबचा टप्पा गाठत २०१६ मधील व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर चित्रपट होण्याचा मान मिळविला आहे. ‘रुस्तम’ चित्रपटाचे एकूण बजेट ४० कोटी रुपये आहे. मात्र या चित्रपटाने आतापर्यंत १०१ कोटींचा व्यवसाय केला आहे. यामध्ये सिनेमाला ६१.३० कोटी म्हणजेच १५३ टक्के निव्वळ नफा झाला आहे, असं वृत्त एका वेबसाईटने दिलं आहे.