Join us

​रिलीजच्या अगोदरच ‘रुस्तम पार्ट २’ जाहीर- छुपा रुस्तम !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:33 IST

रणवीर सिंह अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ मुळे खूपच प्रभावित झाला आहे. झाले असे की, रणवीरने नुकताच एक व्हिडिओ बनविला आहे. ...

रणवीर सिंह अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ मुळे खूपच प्रभावित झाला आहे. झाले असे की, रणवीरने नुकताच एक व्हिडिओ बनविला आहे. अगोदर कोणाला काहीच समजले नाही, मात्र रणवीर बिल्कुल अक्षयच्या लुकमध्ये येतो आणि सांगतो की, ‘अक्की सर, जर आपण रुस्तम आहेत, तर मी छुपा रुस्तम.’ त्यानंतर रणवीर ‘जहर है की प्यार है तेरा चुम्मा’ या गाण्यावर डान्स करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि अक्षयने फ्लाइटमध्ये हा व्हिडिओ पाहिला. विशेष म्हणजे त्याच्या सोबत इलियाना आणि ईशादेखील होती. यानंतर अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, फ्लाइटमध्ये एंटरटेनमेंट पाठविल्याने रणवीरला थॅँक यू! छुपा रुस्तम पागलपण होते, मात्र बदलायचे नाही.