Join us

‘रुस्तम’ मुळे वाचतील अनेकांचे संसार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 18:01 IST

 अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘रुस्तम’ यात त्याच्यासोबत इलियाना डिक्रुझ ही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार एका मुलाखतीत ...

 अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘रुस्तम’ यात त्याच्यासोबत इलियाना डिक्रुझ ही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार एका मुलाखतीत बोलतांना म्हणाला,‘ चित्रपटाचे कथानक हे अत्यंत वेगळे आहे. सत्य कथेवर आधारित हा चित्रपट असून पारसी नेव्ही आॅफीसरच्या भूमिकेत मी दिसणार आहे.मला असे वाटते की, ‘या कथानकामुळे अनेक जोडप्यांचे संसार वाचतील. लोकांना घटस्फोट घेण्यापासून वाचवण्याची शक्ती या कथानकात आहे. रिलेशनशिप काय असे हे तुम्हाला हा चित्रपट शिकवू शकेल.’  या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान, रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर आणि करण जोहर यांनी स्पेशल व्हिडीओज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सलमानने केलेल्या प्रमोशनबद्दल अक्षयने त्याचे आभार मानले.