Join us

अफवांमुळे मीरा त्रस्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 09:51 IST

शाहीद कपूर सध्या ‘रंगून’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून मीराही नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक’ मध्ये आली होती. अनिता डोंगरे यांच्या फॅशन ...

शाहीद कपूर सध्या ‘रंगून’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून मीराही नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक’ मध्ये आली होती. अनिता डोंगरे यांच्या फॅशन शो साठी ती आली होती. तेव्हा ती सर्वांचे आकर्षणाचे स्थळ बनली होती.यावेळी सर्वजण ती गरोदर असल्याच्या चर्चा करत असल्यामुळे मीरा फारच त्रस्त झाली. अगोदरच ती प्रेगनंट असल्याच्या अफवा सर्वांच्या चर्चेचा मुद्दा होऊन बसला आहे. जुलै मध्ये शाहीद आणि मीरा यांनी एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.लग्नानंतर कपूर कुटुंबियांना आशा लागलीये ती त्यांच्या घरात छोटंसं बाळ येण्याची...! शमिरा यांनी अजून ही गोड बातमी निश्चित केली नाही. पण मीराच्या चेहºयावर आई होण्याची चमक दिसते आहे.