Join us

​‘Rio 2016’च्या सदिच्छादूताचा ‘गोंधळात गोंधळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 16:30 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये अ‍ॅथलिट दीपा कर्माकरने ऐतिहासिक कामगिरी करत जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठली. मात्र, आॅलिम्पिकचा सदिच्छादूत असलेल्या सलमान खानला आपल्या या स्टार खेळाडूचे नावही नीट माहित नाही, हेच एका व्हिडिओतून समोर आले.

रिओ आॅलिम्पिकमध्ये अ‍ॅथलिट दीपा कर्माकरने ऐतिहासिक कामगिरी करत जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठली. जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर दीपाने पात्रता फेरीत १४.८५० गुण मिळवत जिम्नॅस्टिक वॉल्टच्या अंतिम फेरीत धडक दिली. दिपाच्या कारगिरीबाबत तिच्यावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षात होत आहे.  मात्र, आॅलिम्पिकचा सदिच्छादूत असलेल्या सलमान खानला आपल्या या स्टार खेळाडूचे नावही नीट माहित नाही,हेच एका व्हिडिओतून समोर आले.  एका चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानला याबाबत विचारण्यात आले असता त्याने सलमानने दिपा कर्माकरचे नाव दीपिका असे उच्चारले. एवढेच नव्हे तर तो चुकल्याचे सांगत, प्रेक्षकांमध्ये उपस्थित एकाने तिचे नाव दीपिका नाही तर दिप्ती असल्याचे सांगून गोंधळात आणखीनच भर घातली. हा गोंधळ या  व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.}}}}