Join us

खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी नेटकऱ्यांनी वाहिली 'या' अभिनेत्याला श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 14:37 IST

Sidharth Shukla Death: काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणा करत सिद्धार्थ शुक्लाऐवजी 'रंग दे बसंती'फेम अभिनेता सिद्धार्थ याला श्रद्धांजली वाहिली आहे.

ठळक मुद्देअभिनेता सिद्धार्थ प्रचंड संतापला असून त्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

'बिग बॉस १४'चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं २ सप्टेंबर (गुरुवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सिद्धार्थने वयाच्या केवळ ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे सर्व स्तरामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यामध्येच काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणा करत सिद्धार्थ शुक्लाऐवजी 'रंग दे बसंती'फेम अभिनेता सिद्धार्थ याला श्रद्धांजली वाहिली आहे.  त्यामुळे अभिनेता सिद्धार्थ प्रचंड संतापला असून त्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवर 'R.I.P सिद्धार्थ' असं लिहिलं आहे. हा फोटो पाहून अभिनेता चांगलाच संतापला असून त्याने नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

''हे ट्विट आणि याचं हे उत्तर. सध्याच्या काळात कोणत्याचं गोष्टीचं नवल वाटायला नको. मी अवाक् झालोय", असं ट्विट सिद्धार्थने केलं आहे. त्याचसोबत त्याने आणखी एक ट्विट केलं आहे. त्यात "द्वेष आणि छळ", असं त्याने म्हटलं आहे.

या ट्विटनंतर सिद्धार्थने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.

दरम्यान, सिद्धार्थ दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने 'कधलील सोधाप्पुवधु येप्पादी', 'जिगरथंडा' आणि 'सिवप्पु मंजल पचाई' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच बॉलिवूडमधील 'रंग दे बसंती' या चित्रपटातही तो झळकला आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाबॉलिवूडTollywoodसेलिब्रिटी