Join us  

'RRR' ठरला 'बेस्ट पॉप्युलर' सिनेमा; राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेत साऊथचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 6:48 PM

दिग्दर्शक राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाने यंदा जगभरात नाव केलंय.

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून विकी कौशलच्या सरकार उधम सिंगला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा तर सुमीत राघवनचा एकदा काय झालं या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह चित्रपटाला स्पेशल ज्युरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, गतवर्षी लोकप्रिय ठरलेल्या राजामौली यांच्या RRR सिनेमाला बेस्ट पॉप्युलर फिल्मचा अवॉर्ड घोषित करण्यात आला आहे. 

दिग्दर्शक राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाने यंदा जगभरात नाव केलंय. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवॉर्डही मिळाला आहे. त्यातच, आता या सिनेमाने ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बेस्ट पॉप्युलर सिनेमाचा खिताब पटकावला. त्यामुळे, राष्ट्रीय पुरस्कारात साऊथ सिनेमाचाही डंका पाहायला मिळाला. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, रामचरण, अजय देवगण, अलिया भट्ट आणि श्रेया शरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

हॉलिवूड क्रिटिक असोसिएशन अवॉर्ड्स २०२३ (HCA Film Awards) च्या पुरस्कारातही RRR ने सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा होण्याचा बहुमान पटकावला होता. याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणूनही RRR ने पुरस्कार पटकावला. भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेत आरआरआर सिनेमाने फिचर फिल्म कॅटेगिरीत बेस्ट एक्शन डायरेक्शन अवॉर्ड, बेस्ट कोरियोग्राफी आणि बेस्ट स्पेशल इफेक्ट्स अवॉर्डवरही नाव कोरलं आहे. त्यामुळे, पुरस्कारांच्या यादीत RRR ची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 

६९ वे सर्वोत्कृष्ट चित्रपट

बेस्ट हिंदी फिल्म- सरदार उधम सिंगबेस्ट गुजराती फिल्म- छेल्लो शोबेस्ट कन्नड़ फिल्म- 777 चार्लीबेस्ट मैथिली फिल्म-  समांतरबेस्ट मराठी फिल्म- Ekda Kay Zalaबेस्ट मलयालम फिल्म- होमबेस्ट तमिल फिल्म- Kadaisi Vivasayiबेस्ट तेलुगू फिल्म- Uppena 

टॅग्स :आरआरआर सिनेमाराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018बॉलिवूड