Join us

वरुण धवनच्या घरी पोहोचला फुटबॉलपटू रोनाल्डिनो; सेल्फी केला शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 22:32 IST

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘जुडवा-२’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो त्याच्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी कुठलीच कसर ठेवू इच्छित ...

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘जुडवा-२’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो त्याच्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी कुठलीच कसर ठेवू इच्छित नाही.  त्याचाच एक भाग म्हणून वरुणचा एक सेल्फी समोर आला असून, त्याचा हा सेल्फी सध्या वाºयासारखा व्हायरल होत आहे. सेल्फीमध्ये वरुणसोबत ब्राझीलचा मिडफील्डर रोनाल्डिनो बघावयास मिळत आहे. असे म्हटले जात आहे की, दोघांची भेट वरुणच्या घरी झाली आहे. या सेल्फीच्या माध्यमातून वरुण मॅचसाठी पोर्तुगाली भाषेत रोनाल्डिनोला शुभेच्छा देत आहे. त्याने सेल्फी शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चांगल्या पद्धतीने खेळ’!वास्तविक वरुण फुटबॉल या खेळाचा चाहता आहे. याचा पुरावा तेव्हा मिळाला होता जेव्हा तो ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. कारण यावेळी तो प्रमोशन सोडून चक्क फिफा वर्ल्ड कपचा प्री-गेम शो बघण्यासाठी गेला होता. दरम्यान, यावेळेसदेखील त्याचा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळाला. फरक फक्त एवढाच की, यावेळेस तो फुटबॉलच्या मैदानात नव्हे तर घरीच फुटबॉल खेळाडूसोबत बघावयास मिळाला. दरम्यान, ‘जुडवा-२’मध्ये वरुण डबल रोलमध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सलमान खानच्या ‘जुडवा’चा रिमेक आहे. त्यामुळे याही चित्रपटात ‘टन टना टन’ आणि ‘ऊंची है बिल्डिंग’ या दोन गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यास चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरुण पहिल्यांदाच जॅकलिन आणि तापसीबरोबर काम करीत आहे.