आर. माधवन या चित्रपटात ऐश्वर्यासोबत रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल कपूरने एका मुलाखतीत म्हटले की, ऐशसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. मात्र ती माझ्या अपोझिट नसल्याचे दु:ख होत आहे. या चित्रपटात आमच्या दोघांचे बरेचसे सीन्स आहेत. मात्र दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रेम दाखविण्यात येणार नाही.’ असेही अनिल कपूरने स्पष्ट केले होते.
दरम्यान, आर. माधवनच्या अगोदर राजकुमार राव, विक्की कौशल तसेच अक्षय ओबेरॉय यांची नावे समोर आली होती. अक्षयचे नाव तर कन्फर्मही झाले होते. परंतु तो विवेक ओबेरॉयचा कजिन असल्याने त्याने ऐश्वर्यासोबत काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. एकेकाळी ऐश्वर्या आणि विवेक यांच्यात अफेअर होते. मात्र काही कारणामुळे हे अफेअर तुटले अन् ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्याबरोबर विवाह केला. त्याच कारणामुळे अक्षय ओबेरॉयने ऐशसोबत काम करण्यास नकार दिला होता.
असो, आता ही भूमिका आर. माधवन याला मिळाली असून, ऐश आणि माधवनची फ्रेश जोडी प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीला प्रेक्षक कितपत पसंत करतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच. गेल्यावर्षी ऐश्वर्या राय-बच्चन ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात झळकली होती. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रणबीर कपूरसोबतचा ऐशचा रोमान्स त्याकाळी चांगलाच चर्चेत राहिला होता, तर आर. माधवन हा ‘खडूस’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर करिष्मा दाखविण्यात सपशेल अपयशी ठरला.