Join us

बिप्सच्या शिफारसीमुळे करणला मिळाला रोल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 13:33 IST

 अभिनेत्री बिपाशा बासु आणि तिचा पती करणसिंग ग्रोव्हर यांनी एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश घेतला आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेले. ...

 अभिनेत्री बिपाशा बासु आणि तिचा पती करणसिंग ग्रोव्हर यांनी एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश घेतला आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेले. हँगआऊट्स, पार्टी, गेटटुगेदर यांच्यामुळे ते दोघेही नेहमीच चर्चेत असतात.मालदीव्ह आणि बाली येथे जाऊन ते परतले आणि त्यांना त्यांचे वर्कआऊट्स आणि करिअरची आठवण झाली. चर्चा आहे की, करणसिंगला मिलाप झव्हेरी यांच्या चित्रपटाची आॅफर मिळाली आहे.पण, त्याअगोदर बिप्सला हा चित्रपट आॅफर करण्यात आला होता. त्यानंतर बिप्सनेच दिग्दर्शकांना करणसिंगचे नाव सुचवले. मात्र, आता बिप्स ही चर्चा चुकीची आणि उथळ असल्याचे सांगते.