Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्या डेब्यूसाठी ‘हा’ रोल परफेक्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 15:31 IST

 टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड  दिशा पाटणी ही ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून तिच्या बॉलीवूडमधील प्रवासाला सुरूवात करणार आहे. तिने या चित्रपटात ...

 टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड  दिशा पाटणी ही ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून तिच्या बॉलीवूडमधील प्रवासाला सुरूवात करणार आहे. तिने या चित्रपटात माहीच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली आहे. तिने टायगरसोबत ‘बेफिक्रा’ मध्येही काम केले आहे. तसेच ती आता हॉलीवूड प्रोजेक्ट ‘पाईपलाईन’ मध्येही जॅकी चॅनसोबत दिसणार आहे.एका मुलाखतीदरम्यान बोलताना तिने सांगितले की,‘माझी भूमिका पाहता ती किती मोठी आहे किंवा तिची काय क्वॉलिटी आहे हे तितकंसं महत्त्वाचं नाहीये. पण, या चित्रपटाच्या माध्यमातून आणि चर्चित चित्रपटातून मला काम करायला मिळतेय, याचा मला जास्त आनंद वाटतोय.खरंतर मी माझ्या हृदयापासून काम करते. आणि ही भूमिका माझ्यासाठी खरंच खुप नवीन संधी घेऊन येतील यात काही शंकाच नाही.