Join us

या व्यक्तीने साकारली ‘जादू’ची भूमिका; एक कोटींचा होता ‘जादू’चा ड्रेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 21:29 IST

अभिनेता हृतिक रोशन सध्या दिग्दर्शक विकास बहल यांच्या ‘सुपर-३०’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार ...

अभिनेता हृतिक रोशन सध्या दिग्दर्शक विकास बहल यांच्या ‘सुपर-३०’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. असो, आज तुम्हाला हृतिकच्या २००३ मध्ये आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातील जादूबद्दल सांगणार आहेत. या सुपरहिट चित्रपटात ज्या व्यक्तीने जादूची भूमिका साकारली त्याच्याबद्दल आजही बºयाचशा लोकांना माहिती नाही. मात्र जादू हे पात्र प्रत्येकाच्याच स्मरणात आहे हेही तेवढेच खरे आहे. चित्रपटात एलियन म्हणजेच जादूची इंद्रवदन जे. पुरोहित यांनी भूमिका साकारली होती. इंद्रवदन यांची उंची तीन फूट असल्यामुळेच त्यांना जादूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. इंद्रवदन यांनी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांनी लहान मुलांची प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘डुबा डुबा-२’मध्ये भूमिका साकारली होती. आज ते या जगात नाहीत. त्यांनी त्यांच्या वयाचे ५० वर्षे इंडस्ट्रीला दिले.  हृतिकने एका मुलाखतीत सांगितले होते की, या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या जादूचा कॉस्ट्यूम आॅस्ट्रेलियात बनविण्यात आला होता. जेम्स कॉलनर नावाच्या आर्टिस्टने त्यास डिझाइन केले होते. हा कॉस्ट्यूम बनविण्यासाठी तब्बल एक वर्ष लागले. यामध्ये काही स्पेशल फिचर्स होते. जसे त्याचे डोळे मानव आणि प्राणी यांच्यात साम्य साधणारे होते. रिपोर्ट्सनुसार या ड्रेसची किंमत सुमारे एक कोटी रूपये इतकी होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या चित्रपटासंबंधी एक किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. त्यांनी म्हटले होते की, ‘चित्रपटात एक सीन आहे, ज्यामध्ये बºयाचशा हत्तींना बघून जादू घाबरून जातो. परंतु वास्तवात असे काहीही झाले नव्हते. कारण जेव्हा हत्तींना सेटवर आणण्यात आले तेव्हा हत्तीच जादूला बघून घाबरून पळू लागले होते. बºयाचशा प्रयत्नानंतर हा सीन शूट करावा लागला.’