Join us

अनारकलीची भूमिका आव्हानात्मक - स्वरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:41 IST

स्वरा भास्कर हिने 'तन्नू वेड्स मन्नू' आणि 'रांझना' मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. आता स्वरा 'अनारकली आरावली' च्या माध्यमातून पुन्हा ...

स्वरा भास्कर हिने 'तन्नू वेड्स मन्नू' आणि 'रांझना' मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. आता स्वरा 'अनारकली आरावली' च्या माध्यमातून पुन्हा एकदा दमदार भूमिकेसह येतेय. अविनाश दास यांच्या चित्रपटात स्वरा हिच्या कॅरेक्टरने दुहेरी अर्थाची गाणी म्हटली आहेत. स्वरा म्हणते की,' अनारकली आरावली ही भूमिका आव्हानात्मक असून मी यात गायिकेची भूमिका केली आहे. ती स्वत:ला आर्टिस्ट मानते. तिचे काम देखील एक कलाच आहे. यातील गायिका बिहारमधून आलेली असते. त्या गावात राजकारण आणि गुन्हेगारी यांची संख्या खुप असल्याने थोडा संघर्ष त्या गायिकेच्या आयुष्यातही होतो.'