‘अल्फाजों की तराह’ मध्ये रॉकी भावनाविवश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 21:51 IST
अंकित तिवारी गेल्या काही वर्षांपासून अनेक हिट्स गाणी बॉलीवूडला बहाल करत आहे.
‘अल्फाजों की तराह’ मध्ये रॉकी भावनाविवश!
अंकित तिवारी गेल्या काही वर्षांपासून अनेक हिट्स गाणी बॉलीवूडला बहाल करत आहे. आता त्याने ‘रॉकी हँण्डसम’ चित्रपटात ‘अल्फाजों की तराह’ हे अतिशय भावनाविवश करणारे गाणे म्हटले आहे. हे गाणे म्हणजे चित्रपटात लहान मुलीचे आणि त्याचे नाते उलगडवणारे आहे. चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला असून भावनाविवश करणारी एक कहाणी हा चित्रपट आहे. जॉन अब्राहम म्हणाला,‘ मला वाटतं की, ‘अल्फाजों की तराह’ हे गाणे अंकित तिवारीचे आत्तापर्यंतचे बेस्ट गाणे आहे. हे गाणे चाहत्यांच्या हृदयाला हात घालेले यात काही शंका नाही. चित्रपट २५ मार्चला रिलीज होणार आहे.