Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रिओमध्येही ‘काला चश्मा’चीच धूम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 18:01 IST

‘बार बार देखों’मधील ‘काला चश्मा’ हे गाणे सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. केवळ एवढेच नाही तर रिओ आॅल्मिपिकमध्येही हे गाणे पोहोचले. नाही कळले ना, अहो, रिओमधील भारतीय हॉकी सामन्याच्यावेळी या गाण्याचा ट्रॅक वाजवला गेला

कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा याच्या ‘बार बार देखों’मधील ‘काला चश्मा’ हे गाणे सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. या गाण्याने अनेक म्युझिक रेकॉर्ड तोडले. इंटरनेटवर या गाण्याने 3.30 कोटी लोकांनी पाहिले. केवळ एवढेच नाही तर रिओ आॅल्मिपिकमध्येही हे गाणे पोहोचले. नाही कळले ना, अहो, रिओमधील भारतीय हॉकी सामन्याच्यावेळी या गाण्याचा ट्रॅक वाजवला गेला. होय, इंडियन हॉकी टीमने गोल केला रे केला की,‘काला चश्मा’चे ट्रॅक वाजवले जायचे. ‘बार बार देखों’चे निर्मात रितेश सिदवानी यामुळे कमालीचे आंनदात आहेत.. निश्चितपणे आॅल्मिपिक सामन्यात आगामी चित्रपटाचे गाणे वाजते त्यांच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. होय ना!!