रिया सेन नुकत्याच तिच्या कमबॅकमुळे चर्चेत आली होती. तिने एकता कपूरच्या वेब सीरीज ‘रागिनी एमएमएस २.२’मधून कमबॅक केले. रियानेच या बातमीला दुजोरा दिला होता, तिने म्हटले होते की, मी डिजिटल मीडियामध्ये पाऊल ठेवले आहे. सध्या रियाचे चाहते तिच्या या नव्या वेब सीरिजमुळे उत्साहित आहेत. तर दुसरीकडे रियाची ही बातमी करोडो चाहत्यांचे मन तोडणारी आहे. असो, रिया आणि शिवम गेल्या काहीकाळापासून एकमेकांना डेट करीत होते. रिया सातत्याने शिवमचे फोटोज् तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करायची.
रियाच्या चित्रपट करिअरविषयी सांगायचे झाल्यास, तिने आतापर्यंत ‘स्टाइल’, ‘दिल विल प्यार-व्यार’, ‘झंकार बीट्स’, ‘तेरे मेरे फेरे ’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याव्यतिरिक्त तिने अनेक तामिळ आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर शिवमविषयी सांगायचे झाल्यास त्याला फोटोग्राफीचा प्रचंड शौक आहे. रियाचे भारतीय चित्रपट सृष्टीशी नाते खूप जुने आहे. कारण तिची आजी सुचित्रा सेन या एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्याचबरोबर रियाच्या आई मून मून सेन आणि बहीण राइमा सेन यांचेदेखील इंडस्ट्रीत मोठे योगदान राहिले आहे. असो, रियाने आता वैवाहिक जीवनाला सुरुवात केली असून, याकरिता ‘सीएनएक्स मस्ती’कडून तिला भरपूर शुभेच्छा !