Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अन् संकोच दूर सारून राय लक्ष्मीने दिले बोल्ड सीन्स..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 17:05 IST

सन २००४ मध्ये नेहा धूपियाची मुख्य भूमिका असलेला ‘जूली’ हा चित्रपट आठवतो? आता ‘जूली’चा सिक्वल येतोयं. दाक्षिणात्य अभिनेत्री राय ...

सन २००४ मध्ये नेहा धूपियाची मुख्य भूमिका असलेला ‘जूली’ हा चित्रपट आठवतो? आता ‘जूली’चा सिक्वल येतोयं. दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी या सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राय लक्ष्मीने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी इतके बोल्ड सीन्स द्यायला राय लक्ष्मी तयार नव्हती. सर्वांसमोर इतके बोल्ड सीन्स देताना ती कमालीची अवघडली होती. पण शेवटी स्क्रिप्टची डिमांड समोर ठेवून लक्ष्मीने अखेर संपूर्ण संकोच आणि लाज बाजूला सोडली. त्यामुळेच बोल्डनेसच्या बाबतीत ‘जूली२’ हा चित्रपट ‘जूली१’ ला बराच मागे सोडणारा ठरणार आहे. लक्ष्मी अनेक सीन्समध्ये बिकनीमध्ये दिसणार आहे.  राय लक्ष्मी किती बोल्ड ठरते, ते लवकरच दिसेल...