Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या अंत्यसंस्कारावेळी भावूक झाली नव्या नवेली नंदा, मामा अभिषेकने दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 15:10 IST

नवी दिल्लीत रितु नंदा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण कपूर आणि बच्चन कुटुंब याप्रसंगी हजर होते.

ठळक मुद्दे 80 च्या दशकात एलआयसीच्या एजंट म्हणून रितु नंदा यांनी काम सुरु केले होते.

राज कपूर यांची लेक तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिच्या सासूबाई रितु नंदा यांचे काल मंगळवारी कर्करोगाने निधन झाले. नवी दिल्लीत रितु नंदा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण कपूर आणि बच्चन कुटुंब याप्रसंगी हजर होते. यावेळी रितु नंदा यांची नात नव्या नवेली नंदा प्रचंड भावूक झालेली दिसली. अशात मामा अभिषेक बच्चन नव्याला आधार देताना दिसला. 

नव्या रडत असून मामा अभिषेक तिचे सांत्वन करत असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नव्या ही रितू यांचा मुलगा निखील नंदा याची मुलगी आहे. निखील नंदाने अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिच्याशी लग्न झाले आहे. निखीलशिवाय रितू यांना एक मुलगी आहे. तिचे नाव नताशा आहे.

 

2018 मध्ये रितु नंदा यांचे पती राजन नंदा यांचे निधन झाले होते. राजन नंदा  एस्कॉर्ट्स ग्रूपचे चेअरमॅन होते.  80 च्या दशकात एलआयसीच्या एजंट म्हणून रितु नंदा यांनी काम सुरु केले होते. अनेक वर्षे त्यांनी हे काम केले. यानंतर त्यांनी स्वत:ची एक खासगी विमा कंपनीही सुरु केली होती. 1969 मध्ये त्यांनी प्रतिष्ठित सुरक्षा एजन्सी   एस्कॉर्ट्स ग्रूपचे मालक राजन नंदा यांच्यासोबत विवाह केला होता. आठ वर्षांपूर्वी रितु यांना कॅन्सरने गाठले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुुरू होता.

टॅग्स :नव्या नवेलीअभिषेक बच्चन