Join us

OMG-रितेश देशमुख अजय देवगणला भांडी घासता- घासता देतोय वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या मागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 19:48 IST

वाचा सविस्तर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात बॉलिवूडच्या कलाकरांनी स्वत:ला घरात सेल्फ क्वारांटाईन करुन घेतले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. अशातच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो  भांडी घासताना दिसतोय. या फनी व्हिडीओच्या माध्यमातून रितेशने बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये रितेशच्या मागे अजयच्या दिलवाले सिनेमातील मौका मिलेगा तो बता देंगे हे गाणं बॉकग्राऊंडला सुरु आहेत. या व्हिडीओत रितेशसोबत जेनिलिया सुद्धा दिसते आहे. 

अजय देवगणचा आज 50 वा वाढदिवस आहे. अजय देवगण याने `फूल और कांटे' सिनेमातून डेब्यू केलं. पण त्याने 1985 साली आलेल्या `प्यारी बहना' या सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमात त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते. यात त्याने मिथुनच्या बालपणीची भूमिका केली होती.

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या तान्हाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा अजय देवगणच्या करिअरमधला 100 सिनेमा आहे. अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

टॅग्स :अजय देवगणरितेश देशमुख