Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर यांनी पोस्ट केला मुलाचा न्यूड फोटो! पोलिसांत तक्रार दाखल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 16:24 IST

बॉलिवूड कलाकारांचे  ट्विट आणि त्यावरून उद्भवणारे वाद आपल्याला नवे नाहीत. आता ताजा वाद अशाच स्वरूपाचा आहे. एका ज्येष्ठ बॉलिवूड ...

बॉलिवूड कलाकारांचे  ट्विट आणि त्यावरून उद्भवणारे वाद आपल्याला नवे नाहीत. आता ताजा वाद अशाच स्वरूपाचा आहे. एका ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याचे ट्विट वादाचे कारण ठरले आहेत. हा अभिनेता कोण तर, ऋषी कपूर. होय,  ट्विटरवर प्रचंड सक्रिय असणा-या आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांच्या एका ट्विटने वाद निर्माण केला आहे. केवळ वादच नाही तर हे ट्विट करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या ट्विट मुळे त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘जय हो फाऊंडेशन’चे सचिव अ‍ॅड. आदिल कादरी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.  ऋषी कपूर यांनी एका लहान मुलाचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याचा आरोप आहे. कादरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही मुंबई पोलीस, मुंबई सायबर सेल आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या पाठींब्याने ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ऋषी कपूर यांच्या आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका लहान मुलाचा नग्न आणि अश्लील फोटो पोस्ट केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. ऋषी कपूर गेल्या बºयाच दिवसांपासून सायबर सेलने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे कोणीतरी याचा निषेध करण्याची आणि त्यांना पायबंद  घालण्याची गरज होती, असेही कादरी म्हणाले. अर्थात वादाचे कारण ठरलेला ऋषी कपूर यांच्या ट्विटमधील तो लहान मुलगा कोण, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र  तो मुलगा नग्न असून, त्या फोटोमध्ये बºयाच चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या  असल्याचे कादरी यांनी म्हटले आहे. ऋषी कपूर यांनी याप्रकरणी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पण वादग्रस्त ठरलेले ट्विट  त्यांनी आपल्या अकाऊंटवरून डिलिट केले आहे.