Join us

या सिनेमानंतर बदलले होते ऋषी कपूर यांचे नशीब, एक रात्रीत बनले स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 13:57 IST

ऋषी कपूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत बऱ्याच सिनेमात काम केले आहे.

अनेक यादगार सिनेमे देणारे, अनेक यादगार भूमिका साकारणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले.. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ऋषी कपूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत बऱ्याच सिनेमात काम केले आहे. त्यांच्या बऱ्याचशा भूमिका गाजल्या आहेत. ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ सुपरडुपर हिट झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये १९७० साली मेरा नाम जोकर सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.  ऋषी कपूर यांनी १९७३ साली बॉबी सिनेमातून अभिनेता म्हणून सुरुवात केली. बॉबीसाठी त्यांना १९७४ साली सर्वश्रेष्ठ अभिनेता फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ साली त्याना लाईफटाईम अचिव्हमेंटसहित अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  १९७१ मध्ये त्यांना पहिल्या सिनेमासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. 

ऋषी कपूर यांनी पत्नी नीतू कपूर यांच्यासोबत १२ सिनेमांमध्ये एकत्र काम केले. १९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते सोलो हिरो होते तर ४१ मल्टिस्टारर सिनेमे होते. अग्निपथमध्ये साकारलेल्या खालनायकाच्या भूमिकेने त्यांनी सगळ्यांना हैराण केेले. इमरान हाश्मीसोबत द बॉडी सिनेमामध्ये ते शेवटचे दिसले . हा सिनेमा १३ डिसेंबर २०१९ला रिलीज झाला होता.  

टॅग्स :ऋषी कपूर