Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना सलमान खानने मागितली माफी, म्हणाला.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 14:56 IST

सलमानने ट्विट करत लिहिले की...

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कपूर खानदानातील तिसऱ्या पिढीतील सर्वात यशस्वी अभिनेता व बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांनी आज जगाला अलविदा केले आहे. त्यांनी विविध भूमिकांतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. अमिताभ बच्चन, मधुर भंडारकर, आमिर खान आणि अनुष्का शर्मासहीत अनेक कलाकारांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.  

याचदरम्यान अभिनेता सलमान खानने देखील ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना त्यांची माफी मागितली आहे. सलमानने ट्विट करत लिहिले की,  'रेस्ट इन पीस चिंटू सर...चुक भूल माफ करावी..कुटुंब आणि मित्रांना हे दुःख सहन करण्याची हिम्मत द्या, शांती द्या..

सलमान खान आणि ऋषी कपूर यांच्यातील संबंध फारशे चांगले नव्हते. सोनम कपूरच्या संगीत सेरेमनीदरम्यान ऋषी कपूर यांनी सोहेल खानच्या पत्नी यांच्यात वाद झाला होता.  यानंतर खान कुटुंब ऋषी कपूर यांच्यावर नाराज होते. तसेही ऋषी कपूर यांचा मुलगा  अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत तर सलमानचा ३६ चा आकडा आहे. सलमानला सोडून कॅटरिना कैफ रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती. हाच तो राग आहे. आज कॅटरिना व रणबीरचे ब्रेकअप झाले आहे. पण अद्यापही हा सलमानच्या मनात रणबीरबद्दलचा राग कायम आहे. त्यामुळेच सलमान व रणबीर दोघेही आमने-सामने येणे टाळतात. 

टॅग्स :ऋषी कपूरसलमान खान