Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘संजू’वर टीका करणा-यास ऋषी कपूर यांनी घातल्या शिव्या, कॉमेडियन अदिती मित्तलने विचारला जाब!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 17:19 IST

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा सोशल मीडियावरचा राग सगळयांनीच पाहिलाय. आक्षेपार्ह ट्वीट करून अनेकदा त्यांनी वाद ओढवून घेतलाय. यावरून ...

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा सोशल मीडियावरचा राग सगळयांनीच पाहिलाय. आक्षेपार्ह ट्वीट करून अनेकदा त्यांनी वाद ओढवून घेतलाय. यावरून त्यांना टीकाही सहन करावी लागलीय. पण कुणाला जुमानतील ते ऋषी कपूर कुठले? अलीकडे ते मुलगा रणबीर कपूरची मुक्तकंठाने प्रशंसा करताना दिसले कारण होते, ‘संजू’चा टीजर. होय, रणबीर कपूरचा आगामी चित्रपट  ‘संजू’चा टीजर पाहून ऋषी यांनी त्याची कधी नव्हे ती तोंडभरून प्रशंसा केली होती. म्हणजेच ऋषी यांना यातील मुलाचा अभिनय प्रचंड आवडला होता. पण ऋषी यांना ‘संजू’चा टीजर आवडला म्हणून तो सर्वांनाच आवडला, असे कसे होऊ शकेल? पण कदाचित ऋषी यांचा असाच अट्टाहास आहे. असे नसते तर ‘संजू’वर टीका करणा-या एका चाहत्याला त्यांनी फटकारले नसतेच. ऋषी कपूरने या चाहत्याला केवळ फटकारले नाही तर त्याला आक्षेपार्ह शिव्याही दिल्यात.मी ‘संजू’चे ट्रेलर पाहून अवाक् झालो. हा संजय दत्तची सार्वजनिक प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे. पण एक गुन्हेगार नेहमीच गुन्हेगार असतो, असे या चाहत्याने लिहिले आणि मग काय, ऋषी कपूर या चाहत्यावर जाम बरसले.साहजिकचं, आता ऋषी यांना टीकेला सामोरे जावे लागतेय. कॉमेडियन अदिती मित्तल हिने ऋषी यांच्या अशा वागण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.'ALSO READ : रणबीर कपूरला मिळाली सर्वात मोठी शाब्बासकी! कुणाची हे जाणून घ्यायचे असेल तर पाहा व्हिडिओ!!‘ऋषी कपूर सर्रास लोकांना आॅनलाईन शिव्या घालतात आणि प्रत्येक न्यूज चॅनेल व एंटरटेंनमेंट पोर्टल त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन आणि त्यांच्या मुलाखती घेण्यात मश्गुल आहेत. जणू त्यांचे वागणे सर्वसामान्य असावे. कुणीही त्यांना त्यांच्या डर्टी मॅसेजबद्दल जाब का विचारू नये. भारत द्वेष आणि तिरस्काराच्या भावनेने आजारी आहे. फिल्म कम्युनिटीतून बाहेर पडून या मुद्यावर कुणी समोर का येत नाही? कारण ते केवळ ऋषी कपूर आहेत म्हणून?’ असे अदितीने म्हटले आहे. आता हे प्रकरण पुढे कसे वळण घेते, ते बघूच.