बॉलिवूड स्टार्सचा उदय : भाग २
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:09 IST
सकारात्मक व उमेद निर्माण करणारी स्टार्सच्या उदयाची खास मालिका आम्ही सीएनएक्समध्ये सादर करीत आहोत. या क्रमात आपण काही स्टार्सचा ...
बॉलिवूड स्टार्सचा उदय : भाग २
सकारात्मक व उमेद निर्माण करणारी स्टार्सच्या उदयाची खास मालिका आम्ही सीएनएक्समध्ये सादर करीत आहोत. या क्रमात आपण काही स्टार्सचा जीवनप्रवास पाहिला (बॉलिवूड स्टार्सचा उदय : भाग 1). त्यांच्यासारखाच संघर्ष करून आपले करिअर यशाच्या शिखरावर नेणार्या स्टार्सची यशोगाथा आपण आज बघणार आहोत. .. हा प्रवास अनेकांसाठी खडतर होता. कोणी ठरवून या क्षेत्रात आले, तर कोणी अपघाताने. काहींनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनेक ठिकाणी सामान्य नोकरी केली आणि नंतर स्टार झाले. बोमन इराणी आज आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारा बोमन इराणी काही काळ मुंबईच्या ताज महल पॅलेस हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होता. आईच्या बेकरी शॉप मधले पदार्थ घरोघर नेऊन विकण्याचे कामही त्याने केले. या कामासोबतच तो फोटोग्राफी शिकला. त्यानंतर मात्र 'मुन्नाभाई एमबीबीएस'ने त्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.रजनीकांत आजचा सुपरस्टार रजनीकांतची तर गोष्टच वेगळी. पूर्वी रजनीकांत बीटीएस म्हणजेच बँगलोर ट्रान्सपोर्ट सिस्टिममध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता. कानडी नाटककार तसेच दिग्दर्शक टोनी मुनीअप्पा यांनी त्याला एका धार्मिक नाटकात सहज म्हणून एक छोटीशी भूमिका करण्याबाबत विचारले. रजनीकांत ती भूमिका स्वीकारली आणि ती सुरुवात त्याला थेट सुपरस्टारपदापर्यंत घेऊन गेली.अक्षयकुमार मार्शल आर्ट शिकण्यासाठी अक्षय बँकॉकला गेला होता. पैसे मिळवण्यासाठी तो हॉटेलात वेटर म्हणून नोकरी करू लागला. नंतर त्याच हॉटेलमध्ये तो शेफ झाला. भारतात येऊन त्याने मार्शल आर्ट शिक्षक म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. त्याच्या एका विद्यार्थ्याच्या मदतीने त्याला मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता राजीव भाटियाचा अक्षयकुमार झाला.अर्शद वारसी हा सगळ्यांचा लाडका 'सर्किट' घरोघरी सौंदर्यप्रसाधने विकायचे काम करायचा. त्यासोबतच तो एका फोटोलॅबमध्येही काम करू लागला. त्याला नृत्यात विशेष रस होता. अकबर सामी यांच्या नृत्यअकादमीत काम करण्याची त्याला संधी मिळाली. नृत्य शिकता शिकता तो कोरिओग्राफीही करायला लागला. 'ठीकाणा' आणि 'काश' या दोन्ही चित्रपटात त्याने महेश भट्ट यांना असिस्ट केले होते.राकेश मेहरा आज अनेक हीट चित्रपट देणारे राकेश मेहरा बॉलिवूडमध्ये येण्याआधी व्हॅक्युम क्लीनर सेल्समन म्हणून काम करत होते. त्यानंतर सेटवर स्पॉटबॉय म्हणूनही त्यांनी काम केले. सिनेमामध्ये आवड निर्माण झाल्यावर त्यांनी अनेक दिग्दर्शकांना असिस्ट करणे सुरू केले आणि स्वत:चे आयुष्य घडवले. आज एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जाते. सकारात्मक व उमेद निर्माण करणारी स्टार्सच्या बॉलिवूड स्टार्सचा उदय : भाग 1