Join us

 या नव्या सिनेमातील रिंकू राजगुरूचा लुक पाहून आठवेल ‘सैराट’ची आर्ची, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 12:39 IST

Video : नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधील रिंकूचा लुक पाहुन सैराटच्या आर्चीची आठवण होतेय.

ठळक मुद्देया सिनेमात रिंकू राजगुरूसोबत अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

2016 साली ‘सैराट’ (Sairat) हा सिनेमा आला आणि तो अफाट गाजला. या सिनेमातील रिंकू राजगुरूनं (Rinku  Rajguru) साकारलेली आर्ची आणि आकाश ठोसरनं साकारलेल्या परश्या या जोडीनं अख्ख्या महाराष्ट्राला याडं लावलं. रिंकू व आकाशचा हा पहिलाच सिनेमा. पण या पहिल्याचं सिनेमांनं दोघांनाही रातोरात स्टार बनवलं. आता तर दोघांच्याही करिअरची गाडी अगदी सूसाट धावतेय. रिंकूचे तर विचारू नका. मराठीसोबत बॉलिवूड आणि डिजिटल माध्यमांवरही तिची चर्चा आहे. याच रिंकूचा आणखी एक हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नेटफ्लिक्सवर रिलीज होणा-या या चित्रपटाचे नाव आहे, ‘अनकही कहानिया’. ( Ankahi Kahaniya ) या चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यातील एका कथेत रिंकू झळकणार आहे.

 

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधील रिंकूचा लुक पाहुन ‘सैराट’च्या आर्चीची आठवण व्हावी. होय, ‘सैराट’चीच आर्ची या सिनेमात आहे की काय असं हा ट्रेलर पाहिल्यानंतर क्षणभर वाटून जातं. मात्र या सिनेमातील रिंकूची ही व्यक्तिरेखा वेगळी आहे. मात्र तिच्या वागण्यात, दिसण्यात आर्चीची झलक सतत जाणवते.  रिंकूने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे.  

या सिनेमात रिंकू राजगुरूसोबत अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. रिंकूच्या या प्रेमकथेत नेमकं काय पाहायला मिळेल हे सिनेमा रिलीजनंतर कळलेच. येत्या 17 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘अनकही कहानिया’ या सिनेमाव्यतिरिक्त ‘200- हल्ला हो’ हा सिनेमा नुकताच झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, रिंकू राजगुरु, बरुण सोबती , उपेंद्र लिमये, सुषमा देशपांडे आदी कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत.

टॅग्स :रिंकू राजगुरूनेटफ्लिक्स