Join us  

आताही काँग्रेस रिहानाचीच बाजू घेणार का? रिहानाचा ‘तो’ फोटो पाहून भडकले राम कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 3:18 PM

पुन्हा का चर्चेत आली रिहाना? काय म्हणाले राम कदम?

ठळक मुद्देरिहानाने भारतातील शेतकरी मुद्यावर केलेले ट्वीट चांगलेच गाजले होते. तिच्या या ट्वीटने अख्खा देश ढवळून निघाला होता. रिहानाने आंदोलनाला पाठींबा देताच, भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता.

भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणारी पॉप स्टार रिहानाने आता काय करावे तर थेट टॉपलेस फोटो शेअर केला. केवळ इतकेच नाही तर सोबत भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीचे पेंडेंट घालून फोटो पोस्ट केलेत. तिच्या या फोटोंवर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपा  नेते  राम कदम यांनी रिहानाच्या या टॉपलेस सेमी न्यूड फोटोंवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.रिहानाने लॉन्जरी  ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस पोज देताना दिसत आहे आणि तिच्या  गळ्यात गणपतीचे पेडेंट आहे. टॉपलेस फोटोमध्ये अशा प्रकारे गणपतीचे पेंडेट परिधान केल्याचे पाहून सोशल मीडियावर रिहानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सोशल मीडियावर रिहानावर प्रचंड टीका होत आहे.

काय म्हणाले राम कदम?

रिहानाच्या या फोटोवर आक्षेप नोंदवत राम कदम यांनी ट्वीट केले आहे. ‘रिहानाने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली आहे, ते अतिशय नीच कृत्य आहे. भारतीय संस्कृतीबद्दल रिहानाला काहीही ठाऊक नाही आणि या संस्कृतीबद्दल अजिबात आदर नाही, हे यावरून स्पष्ट आहे. आता तरी राहुल गांधी व अन्य काँग्रेस नेते तिची मदत घेणे थांबवतील, अशी अपेक्षा आहे,’ असे ट्वीट राम कदम यांनी केले आहे.

कटकारस्थानाअंतर्गत रिहानाने नग्न अवस्थेत भगवान गणेशाचे पेंडेंट घालून देवतांचा अपमान केला. आताही काँग्रेस रिहानाला पाठींबा देणार का? असा सवाल अन्य एका ट्वीटमधून त्यांनी विचारला आहे.

रिहानाने भारतातील शेतकरी मुद्यावर केलेले ट्वीट चांगलेच गाजले होते. तिच्या या ट्वीटने अख्खा देश ढवळून निघाला होता. रिहानाने आंदोलनाला पाठींबा देताच, भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. रिहानाच्या या ट्वीटवर भारतात वेगवेगळ्या स्तरातून  प्रतिक्रिया दिल्या होत्या. शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणा-या रिहानाचे काहींनी भरभरून कौतुक केले होते तर काहींनी आमच्या अंतर्गत मुद्यांत नाक खुपसू नको, अशा शब्दांत रिहानाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला होता. रिहानाच्या जगभर चर्चेत आलेल्या ट्वीटवर बॉलिवूडचे सेलिब्रिटीही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले होते. अक्षय कुमारपासून करण जोहर, अजय देवगण, सुनील शेट्टीपर्यंत अनेकांनी सरकारचे समर्थन करत, रिहानाला अप्रत्यक्षपणे फटकारले होते.

टॅग्स :रिहानाराम कदम