Join us

रिचाने ‘पाण्यात’ लावली ‘आग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 21:03 IST

रिचा चड्ढा हिचा आगामी चित्रपट ‘कॅब्रे’ रिलीजपूर्वीच जाम चर्चेत आलाय.  आता या चित्रपटाचे पहिले गाणे ‘पानी पानी’ रिलीज झालेयं.

रिचा चड्ढा हिचा आगामी चित्रपट ‘कॅब्रे’ रिलीजपूर्वीच जाम चर्चेत आलाय. नुकताच चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. त्यात  रिचाचा अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे ‘पानी पानी’ रिलीज झालेयं. या गाण्यात रिचाने पाण्यात आग लावली आहे. ‘कॅब्रे’मध्ये रिचा कॅब्रे डान्सरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध डान्सर हेलन हिच्या आयुष्यात बेतलेला असल्याचे सांगण्यात ेयेते. मात्र चित्रपटाची निर्माती पूजा भट्ट हिने याचा इन्कार केला. माजी क्रिकेटपटू श्रीसंत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. राहुल राय हाही यात अतिथी भूमिकेत दिसणार आहे.