Join us  

ऋचा चड्ढा- अली फजल कधी करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 12:54 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान या दोघांनी आपले नाते जगजाहिर केले होते. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर उतरत लोकांना सरप्राईज दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसते. नुकत्याच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ऋचा चड्ढा बॉयफ्रेन्ड अली फजलबद्दल भरभरून बोलली. तिला लग्नाच्या प्लॅनिंगबद्दलही विचारले गेले. पण लग्नाचे प्लॅनिंग सांगण्याऐवजी आम्ही किती बिझी आहोत, हेच ऋचाने सांगितले.

‘आमच्या लग्नाचे प्लानिंग करायचे झाल्यास संपूर्ण प्रॉडक्शन टीम लागेल. अली आणि माझ्या प्रॉडक्शन टीमला यासाठी एकत्र यावे लागेल. कारण सध्या आम्ही प्रचंड बिझी आहोत. सध्या अलीला स्वत:ला महिन्यातील पाच दिवस कसेबसे मिळतात. आम्ही कमिटमेंटला घाबरतो असे नाही. पण खरोखर आम्ही खूप बिझी आहोत. इतके की, आम्हाला एकमेकांना भेटायलाही वेळ नाही. अनेकदा आम्ही महिन्यातून दोनदा भेटते. कधी कधी तर अंधेरी ते वांद्रे हे अंतरही लॉन्ग डिस्टंट असल्यासारखे वाटते. अली पहाटे पहाटे शहरात येतो आणि माझी मॉर्निंग शिफ्ट असते. त्यामुळे आम्ही  फक्त व्हिडीओ कॉलवरून बोलतो. अशा परिस्थिती आम्ही लग्न कसे करू शकतो?’ असे ऋचा चड्ढा म्हणाली.

संधी मिळाली की, तुम्ही एकमेकांसोबत कसा वेळ घालवता? या प्रश्नावर बोलताना ऋचा म्हणाली की, अली माझा ब्रेस्ट फ्रेन्ड आहे. मी जिथे असते तिथे येऊन तो मला सरप्राईज देतो. आम्ही एकमेकांसोबत असतो तेव्हा कुकिंग करतो, एकत्र सिनेमे पाहतो, एकत्र वर्कआऊट करतो.

टॅग्स :रिचा चड्डाअली फजल