Join us

रिचा चढ्ढाने खरेदी केली ६४ लाखांची कार; बॉयफ्रेंडला घडविली सैर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 21:50 IST

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘फुकरे रिटर्न’ने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला असून, चित्रपटातील भोली पंजाबन अर्थात रिचा चढ्ढा हिने ...

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘फुकरे रिटर्न’ने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला असून, चित्रपटातील भोली पंजाबन अर्थात रिचा चढ्ढा हिने शॉपिंगचा धडाका लावला आहे. होय, रिचाने चित्रपटाच्या यशानंतर एक नवी मर्सडीज बेंज कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ६४.०१ लाख इतकी आहे. कार खरेदी करताच रिचाने बॉयफ्रेंड अली फजलबरोबर कारमध्ये फेरफटकाही मारला आहे. रिपोर्ट्सनुसार, रिचा चढ्ढा सध्या तिचा को-स्टार अली फजल याला डेट करीत आहे. गेल्या वर्षभरापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ही बाब त्यांनी जाहीरपणे मान्यही केली आहे. कदाचित याच कारणामुळे दोघांना वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये हातात हात घालून जाताना बघण्यात आले. त्याचबरोबर या दोघांना बºयाच इव्हेंटमध्येही एकत्र बघितले आहे. दरम्यान, रिचाचा नुकताच रिलीज झालेला फुकरे रिटर्न हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या ‘फुकरे’चा सीक्वल आहे. चित्रपटात रिचाने भोली पंजाबन नावाच्या एका दबंग महिलेची भूमिका साकारली आहे, तर अलीने जफर भाईची भूमिका साकारली. दरम्यान, अली आणि रिचामधील संबंध तेव्हा समोर आले जेव्हा रिचा तिच्या सो-कॉल्ड बॉयफ्रेंडसोबत वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. या फेस्टिव्हलमध्ये अलीचा ‘विक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ या ब्रिटिश अमेरिकन चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. रिचाने या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावून मीडियाचे लक्ष तिच्याकडे आकर्षित करून घेतले होते. फेस्टिव्हलमध्ये रिचाचा अंदाज बघण्यासारखा होता.