Join us

रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधून झाले धक्कादायक खुलासे, सुशांतच्या वकिलांंनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 11:51 IST

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. आता सीबीआयने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. या तपासणी दरम्यान रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली गेली. यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आता रियाच्या कॉल डिटेल्सवर बरेच प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

सुशांतच्या वकिलांनी रियाचे कॉल डिटेल्ससह त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीच्या विषयीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार जर 8 ते 14 दरम्यान रिया आणि सुशांत यांच्यात काहीच संभाषण झाले नाही तर याचा अर्थ रियाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता.  सुशांतच्या वकिलांनी रिया चक्रवर्ती त्याच्या आयुष्यात खूप हस्तक्षेप करत होती, हा मुद्दाही उपस्थित केला आहे. ती सुशांतला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवत असे, त्यानंतर अचानक त्याच्यापासून दूर गेली याचा सुशांतला प्रचंड मानसिक त्रास झाला. सुशांत सिंग राजपूत नैराश्यात होते  परंतु त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही यावर सुशांतच्या वकिलाने प्रकाश टाकला आहे. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला असून, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रिया चक्रवर्तीला समन्स बजावले. त्यामुळे तिला चौकशीसाठी हजर राहावे लागेल.

  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती