पुन्हा परतली ‘फुकरे’ गँग...पाहा, ‘फुकरे रिटर्न्स’चा ट्रेलर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 15:01 IST
२०१३ साली आलेला ‘फुकरे’ हा सिनेमा आठवतोयं? आता या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘फुकरे रिटर्न्स’ येतोयं आणि हा सीक्वलही प्रेक्षकांचे धम्माल मनोरंजन करणार असे दिसतेयं.
पुन्हा परतली ‘फुकरे’ गँग...पाहा, ‘फुकरे रिटर्न्स’चा ट्रेलर!!
२०१३ साली आलेला ‘फुकरे’ हा सिनेमा आठवतोयं? विनोदाचा तडका असलेला हा फुल टू कॉमेडी चित्रपट प्रचंड गाजला होता. पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे शॉर्टकट्स मारणा-या चार मित्रांची कथा यात दिसली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘फुकरे रिटर्न्स’ येतोयं आणि हा सीक्वलही प्रेक्षकांचे धम्माल मनोरंजन करणार असे दिसतेयं. आता आम्ही हे कशावरून म्हणतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चित्रपटाच्या ट्रेलरवरून आम्ही हा दावा करतोय. होय,‘फुकरे रिटर्न्स’चा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हा ट्रेलर पोट धरून धरून हसवणारा आहे. तुरुंगातून सुटून आलेली भोली पंजाबन पुन्हा एकदा परतलेली यात दिसतेयं.ट्रेलरबद्दल बोलायचे तर, मृगदिप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे रिटर्न्स’च्या ट्रेलरमध्ये एकाहून धम्माल कॉमेडी सीन्स आहेत. काही नवीन गोष्टीही यात बघायला मिळताहेत. म्हणजे, सीक्वलमध्ये काही बदलही दिसणार आहेत. चूचा, लाली यांच्यातील डायलॉग्स धम्माल आहेत. मित्रांना पेचात पाडणाºया मास्टर चूचाची भविष्यवाणीही अफलातून आहे. भोली पंजाबन नागीन बनून डान्स करतानाही ट्रेलरमध्ये दिसतेयं. तुम्हीही हा ट्रेलर पाहा आणि तो कसा वाटतो, ते आम्हाला सांगा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकाल. ‘फुकरे’ बॉक्सआॅफिसवर हिट ठरला होता. एकही मोठा स्टार नसताना या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर ५० कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल किती कमाई करतो, ते बघूच. ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये पुलकित सम्राट, वरूण शर्मा, मनजोत सिंह, रिचा चड्ढा, अली फजल ही आधीचीच कास्ट दिसणार आहे. येत्या ८ डिसेंबरला रिलीज होणा-या या चित्रपटाची टॅगलाईन आधीच्या चित्रपटासारखीच आहे. ‘दुनिया उम्मीद पर नहीं, जुगाड़ पर कायम है’ अशी ही टॅगलाईन आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रचंड लोकप्रीय ठरला होता. आता चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘फुकरे रिटर्न’ प्रेक्षकांच्या किती पसंतीत पडेल, हे लवकरच दिसेल. तोपर्यंत ट्रेलर बघूयात.ALSO READ: जर, रिचा चड्ढा मांजर असती!!