Join us

प्रीति करणार ‘भैय्याजीं’सह वापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 21:06 IST

बॉलिवूड एक्ट्रेस प्रीति जिंटा हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रीति लवकरच कमबॅक करण्याच्या तयारीत आहे आणि तेही सनी ...

बॉलिवूड एक्ट्रेस प्रीति जिंटा हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रीति लवकरच कमबॅक करण्याच्या तयारीत आहे आणि तेही सनी देओल सोबत. या चित्रपटाचे शीर्षकही मोठे मजेदार आहे. काय??‘भैय्याजी सुपरहिट’. गेल्या अनेक वर्षांपासून ‘भैय्याजी सुपरहिट’ रखडलेला आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचे नव्याने शुटींग सुरु होत आहे. नीरज पाठक हे  ‘भैय्याजी सुपरहिट’चे निर्माते आहेत. येत्या १५ एप्रिलपासून या चित्रपटाचे शुटींग सुरु करण्यास प्रीतिनेही होकार दिला आहे. वाराणसीत ४० दिवस हे शुटींग चालेल. ‘भैय्याजी सुपरहिट’साठी प्रीति लग्नानंतर प्रथमच भारतात परतेल. गत महिन्यात जीन गुडइनफ सोबत प्रीति लग्नगाठीत अडकली होती. २०१३ मध्ये प्रीति ‘हॅपी एंडिंग’मध्ये अखेरची दिसली होती.