आदर जैन आहे होम मिनिस्टरचा फॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 17:48 IST
आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आदर हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा ...
आदर जैन आहे होम मिनिस्टरचा फॅन
आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आदर हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. राज कपूर कुटुंबीयांंशी आदरचे जवळचे नाते असल्याने त्याच्या पदार्पणाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.आदर जैन हा मुंबईत लहानाचा मोठा झाला आहे. त्याचे अनेक मित्रदेखील मराठी आहे. त्यामुळे त्याला मराठी भाषा चांगलीच कळते. मराठी भाषा त्याला बोलता येत नसली तरी त्याला मराठी भाषेविषयी प्रचंड प्रेम आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तो एका मराठी कार्यक्रमाचा फॅन आहे.होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील आदेश बांदेकरचे सूत्रसंचालन, या कार्यक्रमातील विविध खेळ प्रेक्षकांना खूपच आवडतात. या कार्यक्रमाला अनेक वर्षं झाले असले तरी या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडलेला नाही. केवळ मराठी नव्हे तर अमराठी लोक देखील या कार्यक्रमाचे फॅन आहेत. आदर जैनदेखील होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा मोठा फॅन आहे आणि त्यानेच ही गोष्ट सीएनक्स प्रतिनिधीशी बोलताना सांगितली आहे. आदर सांगतो, मी मराठी नसलो तरी मराठी भाषा, संस्कृती मला खूपच जवळची वाटते. मला मराठी समजते. तसेच मी मराठी बोलण्याचा प्रयत्न देखील करतो. होम मिनिस्टर हा कार्यक्रम तर मला चांगलाच माहीत आहे. माझ्या घरात अनेकवेळा हा कार्यक्रम पाहिला जातो. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे शीर्षकगीतदेखील आदरला चांगलेच माहीत आहे. त्याने होम मिनिस्टर म्हणत या कार्यक्रमाच्या शीर्षकगीतातील काही ओळी देखील गुणगुणल्या. Also Read : कपूर घराण्याचा नातू आदर जैनचे फरहान अख्तरशी असे कुठले नाते?